गुजरात : गुजरातच्या भरुचमध्ये एका केमिकल कंपनीत स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 6 कामगारांचा मृत्यू झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, आज (सोमवारी) पहाटे 3 वाजताच्या सुमारास दहेज औद्योगिक परिसरात ही घटना घडली. केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटाचा आवाज दूरपर्यंत ऐकू आला. जेव्हा प्लांटचा स्फोट झाला तेव्हा रिऍक्टरजवळ 6 लोक काम करत होते. डिस्टिलेशन प्रक्रियेदरम्यान स्फोट झाला. स्फोटामुळे आग लागली, त्यात होरपळून 6 जणांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र, या स्फोटामुळे 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. कारखान्यातील आग विझवण्यात आली आहे. या अपघातात अन्य कोणीही जखमी झालेले नाही.




