2 Dead, 46 Stuck In Cable Car Mishap in Jharkhand’s Deoghar

देवघर रोपवे केबल कार दुर्घटना : दोन महिला पर्यटकांचा मृत्यू, 46 जण 2000 फूट उंचीवर अडकलेले, बचाव कार्य सुरु

देश

झारखंड : झारखंडमधील देवघर जिल्ह्यातील बैद्यनाथ मंदिराजवळील त्रिकुट टेकडीवर रोपवेवरील काही केबल कार एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला. रविवारी सायंकाळी देवघर येथे झालेल्या रोपवे दुर्घटनेत दोन महिला पर्यटकांचा मृत्यू झाला असून सुमारे 50 पर्यटक अजूनही 2000 फूट उंचीवर अडकले आहेत. सर्व प्रयत्न करूनही सुमारे 20 तास उलटूनही त्यांना उतरवता आले नाही. बचाव मोहिमेवर हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आले आहेत, मात्र तारांमुळे हेलिकॉप्टरला ट्रॉलीपर्यंत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. अडकलेल्या लोकांपर्यंत अन्न किंवा पाणी पोहोचत नसून आता कुटुंबीयांचा संयमही संपत चालला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ताज्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे की रोपवेमधील किमान 12 केबिनमध्ये 46 लोक अजूनही अडकले आहेत, ज्यासाठी बचाव कार्य सुरू आहे. बचावकार्यासाठी दोन एमआय-१७ हेलिकॉप्टरही तैनात करण्यात आल्याची माहिती भारतीय हवाई दलाच्या (आयएएफ) अधिकाऱ्यांनी दिली. याशिवाय, ITBP आणि NDRF टीमही घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. स्थानिक ग्रामस्थ देखील IAFm, आर्मी, ITBP आणि NDRF यांना बचाव कार्यात मदत करत आहेत. डीसी आणि पोलिस अधीक्षक सुभाष चंद्र जाट हे दोघेही घटनास्थळावरून बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत.

या घटनेनंतर एका जोडप्याने केबल कारमधून उडी मारण्याचा प्रयत्न केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आठ जणांवर देवघर सदर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रथमदर्शनी, केबल कारची टक्कर होऊन तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही घटना घडल्याचे दिसते. तथापि, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेनंतर रोपवे व्यवस्थापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत