मुंबई : आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झालेली नाही. पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबई इंडियन्स संघाने सुरुवातीचे चारही सामने गमावले आहेत. गेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने त्यांचा पराभव केला. चौथ्या पराभवानंतर आता थेट संघ मालक निता अंबानी यांनी खेळाडूंना फोन केला.
मुंबई इंडियन्सच्या सलग चौथ्या पराभवानंतर नीता अंबानी यांनी फोन करून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. या फोन कॉलचा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. खेळाडूंशी बोलताना निता अंबानी म्हणतात की, मला तुमच्या सर्वांवर पूर्ण विश्वास आहे. आणि मला आशा आहे की आपण पुढे जाऊ. आपल्याला स्वत:वर विश्वास ठेवण्याची गरज आहे की आपण जिंकणार आहोत. आपण याआधी ही अशा प्रकारच्या परिस्थितीला सामोरे गेलो आहोत. अशा परिस्थितीतून पुढे जात आपण विजेतेपद मिळवले आहे. यामुळेच मला विश्वास वाटतो की आपण एकमेकांना साथ देऊ. जर आपण एकमेकांसोबत राहिलो तर विजय नक्कीच मिळवू. तोपर्यंत तुम्हाला जे काही हवे आहे, त्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा असेल. कृपया एकमेकांवर आणि स्वत:वर विश्वास ठेवा. मुंबई इंडियन्स नेहमीच तुमच्या सोबत असेल.
????? & ?????? ?
Mrs. Nita Ambani’s message to the team after #RCBvMI.#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians MI TV pic.twitter.com/CT6XmmvjL7
— Mumbai Indians (@mipaltan) April 10, 2022
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना १३ एप्रिल रोजी पुण्यात पंजाब किंग्जविरुद्ध होणार आहे. त्यापूर्वी नीता अंबानी यांनी फोन करून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे आयपीएलच्या सुरुवातीलाच सलग सामने गमावण्याची मुंबई इंडियन्सची ही पहिली वेळ नाही. २०१४ साली मुंबईने पहिल्या पाच लढती गमावल्या होत्या. त्यानंतर हंगामात १४ गुणांसह चौथे स्थान मिळवले होते. २०१५ साली पहिल्या ४ लढती गमावल्यानंतर मुंबईने अंतिम फेरीत धडक मारली होती आणि चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून विजेतेपद मिळवले होते.




