Chief Minister Eknath Shinde

ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश

ठाणे महाराष्ट्र

ठाणे : ठाणे लोकसभेची जागा राखण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना यश आलं आहे. ठाण्याची जागा शिवसेनाच लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. लोकसभेसाठी आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के आणि मीनाक्षी शिंदे यांची नावं चर्चेत आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार राजन विचारे अद्यापही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. विचारे यांच्यासमोर अद्याप महायुतीने उमेदवार दिलेला नाही. ठाण्याच्या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच चालू होती. मात्र आता ठाणे लोकसभा एकनाथ शिंदेची शिवसेना लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. ठाणे लोकसभेचा उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरी हा निर्णय येत्या दोन दिवसात होऊ शकतो. लोकसभेसाठी आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के आणि मीनाक्षी शिंदे यांची नावं चर्चेत आहेत.

शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांची कर्मभूमी राहिलेला ठाणे मतदारसंघ १९९६ पासून शिवसेनेकडे आहे. इथून सातत्यानं सेनेचे उमेदवार विजयी झाले. आनंद दिघेंच्या निधनानंतर शिंदेंनी ठाण्यावर वर्चस्व प्रस्थापित केलं. पक्षफुटीनंतर बहुतांश माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदेंसोबत गेले. लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या सहा जागा येतात. त्यापैकी ३ जागा भाजप, २ जागा शिंदेसेना आणि १ जागा अपक्ष आमदाराकडे आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत