So no one should get excited, Chandrakant Patil replied to Ajit Pawar

…त्यामुळे कोणीही हुरळून जाऊ नये, चंद्रकांत पाटील यांनी दिलं अजित पवार यांना प्रत्युत्तर

महाराष्ट्र राजकारण

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “देवेंद्रजी, मी पुन्हा कोल्हापूरला जाणार आहे.” असं सांगितलं होतं. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना टोला लगावला होता. आता त्यांना चंद्रकांत पाटील यांनी सडेतोड उत्तर दिलं.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एक जण म्हणतो मी पुन्हा येईन, एक म्हणतो मी पुन्हा जाईन, अजित पवार यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

मी कोल्हापूरला परत जाणार या वाक्याने कोणीही हुरळून जाऊ नये. मी केंद्राने दिलेले मिशन पूर्ण होईपर्यंत कुठेही जाणार नाही. आयुष्यात कुठेतरी स्थिरावायचं असतं, त्या अर्थी मी गिरीश बापटांच्या भाषणाचा संदर्भ घेऊन बोललो होतो. मी जे बोललो त्याचा संदर्भ लगेच बॅग आवरून जाण्याचा नाही. अजित पवार आता बोलू लागले आहे. त्याला आम्ही उत्तर देणार हे नक्की. हा केवळ क्रिया आणि प्रतिक्रियाचा खेळ आहे. अजित पवारांना आमच्या पक्षाची काय पडली. त्यापेक्षा त्यांनी त्यांचं बघावं. त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या स्थानाची काळजी करावी. भविष्यात शरद पवारांना एखादं मोठं पद कोणाला द्यायचा निर्णय घ्यावा लागला तर ते नक्की कोणाला देतील याचा विचार अजित पवारांनी करायला हवा”, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत