Distribution of school materials to needy students of Davje Primary School
पुणे महाराष्ट्र

सामाजिक बांधिलकी! डावजे प्राथमिक शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

पुणे : पुण्यातील आंबेगाव बुद्रुक येथील चिंतामणी गार्डन गृहरचना संस्थेच्या वतीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. त्यातच आता मुळशी तालुक्यातील डावजे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्या २५ गरजू आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

चिंतामणी गार्डन सोसायटीचे अध्यक्ष सुनील पाबळे यांनी सर्व १४९ फ्लॅटधारकांना स्वेच्छेने मदत निधी देण्याचे आवाहन केले होते. त्याला सर्व सभासदांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. जमा रकमेतून शालेय साहित्य घेऊन ते गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आले. यावेळी सोसायटीचे अध्यक्ष सुनील पाबळे, खजिनदार जयवंत पाटील, सचिव दीपक तावडे, संचालक प्रभाकर कुंभार, मदन खुटवड, राजेंद्र जगताप, तसेच डावजे गावचे सरपंच रामदास मानकर, ग्रामपंचायत सदस्या पूजा मानकर, शाळाव्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुलोचना वांजळे, मुख्याध्यापिका मनीषा पाबळे, सहशिक्षिका सारिका डोईफोडे आदी उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत