How to update photo and mobile number in Aadhar card
काम-धंदा देश

अलर्ट! आधार कार्डशी संबंधित ‘या’ दोन सेवा UIDAI ने केल्या बंद, जाणून घ्या…

नवी दिल्ली : देशातील सर्वांसाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. सरकारी कामापासून बँकिंग किंवा इतर महत्त्वाच्या कामांसाठी आधार कार्ड असणे अनिवार्य आहे. तसेच, आधार कार्डमध्ये देण्यात आलेली माहिती संपूर्णपणे अपडेट असणे खूप महत्वाचे असते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून वेळोवेळी आधारसंदर्भात सर्व प्रकारच्या अपडेट देण्यात येतात. दरम्यान, यूआयडीएआयने आता आधारशी संबंधित दोन सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. त्याचा परिणाम सर्व आधार कार्डधारकांवर होणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

  • पत्ता वैधता पत्र (Address Validation Letter) :
    यूआयडीएआयने अ‍ॅड्रेस वैलिडेशन लेटरद्वारे आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची सुविधा पुढील आदेश येईपर्यंत बंद केली आहे. आतापर्यंत भाडेकरू किंवा इतर आधार कार्डधारक या सुविधेद्वारे आपला पत्ता सहजपणे अपडेट करू शकत होते. परंतु आता यूआयडीएआयने आपल्या वेबसाइटवरून अ‍ॅड्रेस वैलिडेशन लेटरशी संबंधित पर्याय काढून टाकला आहे. यूआयडीएआयच्या म्हणण्यानुसार, ‘पुढील आदेश येईपर्यंत ही सुविधा बंद करण्यात आली आहे.

या यादीतून कोणत्याही एका वैध अ‍ॅड्रेस पुराव्याच्या आधारे आपण आपला पत्ता अपडेट करू शकता: https://uidai.gov.in/images/commdoc/valid_documents_list.pdf

या निर्णयामुळे आधार कार्डमधील पत्ता अपडेट करताना लोकांना त्रास सहन करावा लागणार आहे. विशेषत: जे लोक भाड्याच्या घरात राहत आहेत किंवा बर्‍याच काळासाठी नोकरी बदलत आहेत, त्यांना आता आधारवर पत्ता अपडेट करणे कठीण होऊ शकते. ज्यांच्याकडे पत्ता अपडेट करण्यासाठी कोणताही पुरावा नाही, त्यांच्यासाठी देखील ही मोठी समस्या ठरू शकते.

  • आधार कार्ड पुनर्मुद्रण (Aadhaar Card Reprint) जुनी पद्धत झाली बंद
    यूआयडीएआयने जुन्या पद्धतीने आधार कार्ड पुनर्मुद्रण सेवा बंद केली आहे. वास्तविक, आता जुन्या कार्डाऐवजी यूआयडीएआय प्लास्टिक पीव्हीसी कार्ड जारी करते. हे कार्ड जवळ बाळगणे सोपे आहे. ते डेबिट कार्डसारखे असते. आधार कार्डची आवश्यकता सर्वत्र असते. अशा परिस्थितीत, आता आपण हे नवीन कार्ड सहजपणे खिशात किंवा पाकीटात ठेवू शकता.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत