PM Modi cancels visit to Bengal on Friday, will hold high-level meet
देश

सामूहिक शक्ती आणि सेवाभावाने देशाला प्रत्येक वादळातून बाहेर काढले – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधला. संपूर्ण देश कोरोनाविरोधात पूर्ण ताकदीने लढत आहे. या संकटात भारत अनेक नैसर्गिक आपत्तींचाही धैर्याने सामना केला आहे. आव्हान कितीही मोठे असो भारताचा विजय संकल्प तेवढाच मोठा असतो. देशाची सामूहिक शक्ती आणि आपल्या सेवाभावाने देशाला प्रत्येक वादळातून बाहेर काढले आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कोरोनाविरोधातील लढाई खूप मोठी आहे. आपला देश रेल्वे प्रमाणे जमीन, हवाई आणि जलमार्गांद्वारे काम करत आहे. हवाई दलाची विमानं रिकामे ऑक्सिजन टँकर्स प्लांटपर्यंत पोहोचवत आहेत. दुसरीकडे ऑक्सिजन निर्मितीचे कामही होत आहे. विदेशातून ऑक्सिजन, ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर आणि क्रिप्टोजेनिक टँकरही देशात आणले जात आहेत. यामुळे यात हवाई दल, नौदल आणि भारतीय लष्करसाह DRDO ही कामाला लागली आहे. आपल्या सर्व संस्था एकजुटीने काम करत आहेत. अनेक शास्त्रज्ञ, औद्योगिक तज्ज्ञ आणि तंत्रज्ञ युद्ध पातळीवर काम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले.

आपल्या रेडिओ कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेशातील जौनपूरच्या दिनेश बाबुलनाथ उपाध्याय यांच्याशी संवाद साधला. उपाध्याय हे लिक्वीड ऑक्सिजनच्या टँकरची वाहतूक करतात. पंतप्रधान मोदींनी त्यांच्या कामाच्या अनुभवासह त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केली. त्यांच्या कामाचीही PM मोदींनी कौतुक केले. ऑक्सिजन टँकर चालक म्हणजे देवदूतच आहे. हे मोठ्या जबाबदारीचे काम आहे. यात मानसिक दबाव असतो हे आम्ही समजू शकतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी ऑक्सिजन एक्स्प्रेसचे लोको पायलट शिरिजा गजनी यांच्याशी संवाद साधला. ऑक्सिजनची वाहतूक अधिक जलद आणि सुरळीत करण्यासाठी रेल्वेकडून ऑक्सिजन एक्स्प्रेस चालवली जात आहे. महिला पायलट शिरिजा गजनी यांचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. कोरोना संकटात आपल्या सारख्या महिला पुढे येऊन कोरोनाविरोधी लढाईत देशाला ताकद देत आहेत. आपण नारी शक्तीचे एक मोठे उदाहरण आहात, असं मोदींनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन पटनायक यांच्याशीही संवाद साधला. कोविड संकटात हवाई दलाकडून सुरू असलेल्या कामाचेही कौतुक केले. कोरोनाविरोधी युद्धे आणि भारतीय सैन्याच्या जवान करत असलेल्या कामाला मी सॅल्यूट करतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. जगावर हे संकट १०० वर्षांनी आले आहे. हे एका शतकातील सर्वात मोठे संकट आहे. अशा प्रकारच्या कामाचा आपल्याकडे कुठलाही अनुभव नाही. यामागे देशसेवेचे इच्छाशक्ती आणि एक संकल्पशक्ती आहे. देश असे काम करत आहे जे आधी कधीच केले नव्हते, असं पंतप्रधान म्हणाले. सामान्यतः आपल्याकडे ९०० मेट्रीक टन लिक्वीड ऑक्सिजनचे उत्पादन केले जात होते. आता हे उत्पादन १० पटीने वाढले आहे. दिवसाला जवळपास ९५०० टन लिक्लिड ऑक्सिजनचे उत्पादन होत आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत