A minor girl was molested by an old man

खळबळ! अल्पवयीन मुलीचा वृद्धाने घरात घुसून केला विनयभंग

अमरावती महाराष्ट्र

अमरावती : एका १६ वर्षीय मुलीचा एका वृद्धाने तिच्या घरात घुसून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ही मुलगी तिच्या काकाच्या घरी गेली होती. तिथेच या वृध्दाने अल्पवयीन मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रकारामुळे मुलगी घाबरून ओरडली. त्यावेळी पीडित मुलीच्या दोन बहिणी पळत आल्यानंतर तो वृध्द घरातून निघून गेला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, एक वृध्द व्यक्ती मंगळवारी (२५ मे) पिडीत मुलीच्या काकाच्या घरात घुसला. पिडीत मुलीचे काका ऑटो चालक आहेत. या वृद्धाने मुलीला काका घरी आहे का, असे विचारले. त्यावेळी मुलीने काका घरी नसल्याचे सांगताच त्या वृध्दाने मुलीशी लगट केली. या प्रकारामुळे मुलगी खूप घाबरली व तिने आरडाओरड केली, त्यावेळी घरात पिडीत मुलीच्या दोन लहान बहिणी होत्या, त्या काय झालं बघण्यासाठी आल्यानंतर तो वृध्द घरातून निघून गेला. पीडित मुलीने तात्काळ या घटनेची माहिती तिच्या काकांना दिली. त्यानंतर ते तातडीने घरी आले.

पिडीत मुलीने या प्रकरणी बुधवारी (२६ मे) राजापेठ पोलिसांत तक्रार दाखल केली. मुलीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अश्लिल चाळे करणाऱ्या अज्ञात वृध्दाविरुध्द विनयभंग, पॉक्सो कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. वृध्द सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

संतापजनक! मित्राच्या दीड वर्षाच्या बाळाला पाजली दारू, प्रकृती चिंताजनक

संतापजनक : किरकोळ कारणावरून दलित मजुराच्या कुटुंबीयांचे अपहरण, गरोदर पत्नीवर मुलांसमोरच बलात्कार

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत