Alcohol given to a friend's one and a half year old baby, health is critical
देश

संतापजनक! मित्राच्या दीड वर्षाच्या बाळाला पाजली दारू, प्रकृती चिंताजनक

भोपाळ : एका व्यक्तीने आपल्या मित्राच्या दीड वर्षाच्या निरागस बाळाला दारू पाजल्याची संतापजनक घटना घडली आहे. भोपाळ शहरातील अशोका गार्डन पोलिस स्टेशन परिसरातील रूप नगरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. दारू पाजल्यामुळे या बाळाची तब्येत बिघडली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परंतु, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेख फिरोज हे आपल्या कुटुंबियांसह रूप नगरमध्ये राहतात. त्यांचा वैयक्तिक व्यवसाय आहे. त्यांना दीड वर्षाचा मुलगा आहे, ज्याचे नाव शेख शहीद आहे. त्यांच्या घराजवळच संदीप भाटिया नावाची एक व्यक्ती राहते. शेख फिरोजशी संदीप भाटिया याची चांगली मैत्री आहे.

शुक्रवारी संध्याकाळी संदीप भाटिया हा शेख फिरोजच्या घरी गेला आणि दीड वर्षाच्या मुलाला खायला घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर तो मुलाला घेऊन घराबाहेर पडला आणि एका कट्ट्यावर जाऊन बसला. तिथे त्याने दारू पिण्यास सुरुवात केली. मद्यपान करताना त्याने दीड वर्षाच्या बाळाला देखील दारू प्यायला दिली. मुलगा बराच वेळ परत न आल्यामुळे त्याचे वडील शेख फिरोज त्याला शोधू लागले, तेव्हा त्यांना संदीप भाटिया एका कट्ट्यावर बसलेला दिसला आणि त्यांचा मुलगा त्याच्या जवळच उलट्या करताना दिसला.

यासंदर्भात त्यांनी संदीप भाटिया याला विचारले असता त्यानें अगोदर उडवाउडवीची उत्तरे द्यायला सुरुवात केली. परंतु, मुलाच्या वडिलांनी कठोरपणे विचारल्यावर त्याने सांगितले की मुलाने कोल्ड ड्रिंकमध्ये मिसळलेली दारू प्यायली होती. दरम्यान, थोड्याच वेळात ते बाळ बेशुद्ध झाले. त्याच्या वडिलांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत आरोपी संदीप भाटिया याला ताब्यात घेतले. मुलाला त्यांनी तात्काळ हमीदिया रुग्णालयात दाखल केले, तेथे त्याच्यावर उपचार सुरु आहेत, परंतु, बाळाची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले आहे.

हृदयद्रावक : आई वडिलांच्या भांडणात २ चिमुकल्यांचा मनाला चटका लावणारा अंत…

संतापजनक : किरकोळ कारणावरून दलित मजुराच्या कुटुंबीयांचे अपहरण, गरोदर पत्नीवर मुलांसमोरच बलात्कार

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत