नवी दिल्ली: भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मुर्मू या देशाच्या नव्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्यांनी यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. सकाळपासून या निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू होती. द्रौपदी मुर्मू यांना 812 मतं तर यशवंत सिन्हा यांना 521 मतं मिळाली आहेत. राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील. द्रौपदी मुर्मू या 24 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी समाप्त होणार आहे.
द्रौपदी मुर्मू या या मतमोजणीत आघडीवर होत्या, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात होता. भाजपकडून त्यांच्या विजयाचा जल्लेष साजरा करण्यात येत होता. आमदारांत्या मतदानानंतर दुसऱ्या फेरीच्या मतमोजणीनंतर ३२१९ मते मोजण्यात आली होती, ज्या मतांचे मुल्यम ८ लाख ३८,८३९ त्यापैकी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजे ५ लाख ७७ हजार ७७७ मुल्यांची २१६१ मते खासदार आणि आमदारांची मते मुर्मू यांना मिळाली आहेत.
तर युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना १०५८ इतकी मते आमदार आणि खासदारांनी दिली आहेत ज्यांचं मुल्य २ लाख ६१ हजार ६२ होतं. तीसरी आणि शेवटच्या फेरीतील मते मोजण्यात आल्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात येईल. एकूण मतांचे मुल्य दहा लाखापेक्षा जास्त आहे, त्यामध्ये पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मते मिळवणारा उमेदवार या निवडणूकीत विजयी होतो. महत्वाचे म्हणजे मुर्मू यांना तेवढी मते मिळाली आहेत.
I would like to thank all those MPs and MLAs across party lines who have supported the candidature of Smt. Droupadi Murmu Ji. Her record victory augurs well for our democracy.
— Narendra Modi (@narendramodi) July 21, 2022
विशेष म्हणजे 15 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 21 जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 रोजी झालेल्या मतमोजणीत प्रतिभा पाटील यांचा विजय झाला होता. त्यांनी 25 जुलै 2007 रोजी पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली होती. त्या देशाच्या 12 व्या राष्ट्रपती होत्या. 2007 ते 2012 या कालावधीत त्यांनी देशाचं सर्वोच्च पद भूषवलं. त्यानंतर आता द्रौपदी मुर्मू यांनी निवडणुकीत बाजी मारली आहे.
नव्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूकोण आहेत?
द्रौपदी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ मध्ये झाला. मुर्मू या ओदिशा जिल्ह्यातील मयुरभंज जिल्ह्यातील आदिवासी समाजाचं प्रतिनिधीत्त्व करतात. सरकारी कार्यालयात त्या लेखनिक मधून कार्यरत होत्या. मुर्मू यांनी मोफत अध्यापनाचं काम केलं त्यानंतर त्या राजकारणात आल्या. भाजपच्या आमदार म्हणून द्रौपदी मुर्मू २००० आणि २००९ मध्ये विजयी झाल्या. भाजपमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केलं आहे. भाजपच्या आदिवासी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांनी २०१३ ते २०१५ मध्ये काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू यांनी नगरसेवक म्हणून राजकीय कारकीर्द सुरु केली. रायरंगपूरच्या उपनगराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. भाजपमध्ये द्रौपदी मुर्मू यांनी विविध पदांवर काम केलं आहे.




