Sri Lanka New PM Dinesh Gunawardena Takes Oath

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुणवर्धने यांची निवड

ग्लोबल

दिनेश गुणवर्धने श्रीलंकेचे नवे पंतप्रधान बनले आहेत. राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. गुणवर्धने हे शिक्षणमंत्री राहिलेले आहेत. 2020च्या संसदीय निवडणुकीनंतर त्यांची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ते रानिल विक्रमसिंघे यांचे वर्गमित्र आहेत. श्रीलंकेच्या संसदेने 20 जुलै रोजी माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची नवीन राष्ट्रपती म्हणून निवड केली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

श्रीलंकेत नव्या राष्ट्रपतींचाही विरोध :

रानिल विक्रमसिंघे राष्ट्रपती झाल्यानंतरही श्रीलंकेत शांतता प्रस्थापित झालेली नाही. ते गोटाबायांचे प्यादे असल्याचे सांगत आंदोलकांनी आंदोलन अधिक तीव्र केले आहे. गुरुवारी उशिरा कोलंबोमधील श्रीलंकेच्या राष्ट्रपती सचिवालयाच्या बाहेर गाले फेसमध्ये सुरक्षा दले आणि शेकडो निदर्शकांमध्ये संघर्ष उडाला. आंदोलकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रपती सचिवालयाच्या आवाराबाहेर सशस्त्र फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत