BSF GD constable recruitment 2021 online application started
काम-धंदा देश

दहावी पास झालेल्यांसाठी सीमा सुरक्षा दलात भरतीची मोठी संधी

BSF Constable GD Recruitment २०२१ : केंद्र सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयांतर्गत सीमा सुरक्षा बलाने (BSF) नॉन-गजेटेड आणि नॉन-मिनिस्ट्रियल कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी) ग्रुप सी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. सीमा सुरक्षा दल (BSF) मध्ये भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. BSF द्वारे एकूण २६९ रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. ही भरती क्रीडा कोट्यांतर्गत होणार आहे. बीएसएफ कॉन्सटेबल जीडी भर्ती 2021 अधिसूचनेनुसार कॉन्स्टेबल (जीडी) ग्रुप सी पदांवर भरती होईल.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अर्ज कुठे आणि कसा करायचा?

बीएसएफ कॉन्स्टेबल जीडी भरती 2021 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑफिशियल रिक्रूटमेंट पोर्टल, rectt.bsf.gov.in वर उपलब्ध केलेल्या ऑनलाइन अॅप्लिकेशन फॉर्मच्या माध्यमातून अर्ज करायचा आहे. बीएसएफ जीडी कॉन्सटेबल पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सोमवार ९ ऑगस्ट २०२१ पासून सुरू झाली आहे. उमेदवार २२ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत.

उमेदवार या थेट लिंकद्वारे देखील भरतीची अधिसूचना डाऊनलोड करू शकतात

या लिंकद्वारे थेट अॅप्लिकेशन पेज वर जाऊ शकतात.

पात्रता :

  1. ज्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त बोर्डातून दहावीची परीक्षा दिली आहे आणि पदांनुसार संबंधित खेळात १ सप्टेंबर २०१९ ते २२ सप्टेंबर २०२१ या कालावधीत भाग घेतला आहे किंवा पदक मिळवले आहे, असे उमेदवार बीएसएफ क्रीडा कोट्यांतर्गत कॉन्स्टेबल जनरल ड्युटी पदांसाठी अर्ज करू शकतात.
  2. पुरुष उमेदवारांची शारीरिक उंची किमान १७० से.मी. आणि महिला उमेदवारांची शारीरिक उंची किमान १५७ से.मी. असायला हवी.
  3. उमेदवारांचे वय १ ऑगस्ट २०२१ रोजी किमान १८ वर्ष ते कमाल २३ वर्ष असावे. अन्य संबंधित पात्रतेसाठी भरती अधिसूचना वाचावी.
Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत