राजस्थान : प्रवाशाच्या मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे एअर इंडियाच्या विमानाचे राजस्थानच्या उदयपूर येथे आपत्कालीन लँडिंग करावे लागले, यावेळी मोठा अनर्थ टळला. फ्लाइटमध्ये एकूण 140 प्रवासी होते.
एअर इंडियाच्या फ्लाइट 470 मध्ये एका प्रवाशाच्या मोबाईल फोनचा स्फोट झाला आणि त्यानंतर पायलटला फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. सर्व तांत्रिक तपासणीनंतर विमान दिल्लीला रवाना झाले. फ्लाईटदरम्यानच फ्लाइटच्या आत असलेल्या मोबाईल फोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याने प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाने उदयपूरहून दिल्लीला दुपारी एक वाजता उड्डाण केले. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच प्रवाशाच्या मोबाईल फोनची बॅटरी फुटली. उदयपूरच्या दाबोक विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करताना काही प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले. त्यानंतर फ्लाइटची व्यवस्थित तपासणी करण्यात आली आणि सर्व काही व्यवस्थित असल्याची खात्री झाल्यानंतरच फ्लाइटला दिल्लीला जाण्याची परवानगी देण्यात आली.




