पुणे : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असे म्हटले जाते. राज्यातील विविध रुग्णालये आणि रक्तपेढींमधील रक्ताचा साठा कमी पडू लागला आहे. नेहमीच मे-जून दरम्यान सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासतो, अनेक तरुणांना रक्तदान करण्याची इच्छा असूनही महाविद्यालय बंद असल्याकारणाने रक्तदान करता येत नाही, तसेच कारखाने, विविध छोटे उद्योग धंदे हे देखील रक्तदान चळवळी मध्ये अग्रणण्याने सहभागी असतात पण हे कारखाने, उद्योग धंदे देखील कोरोनामुळे बंद असल्याने रक्त संकलनास अडचणी येत आहेत. त्यामुळे राज्यातील रक्तसाठा मोठ्या प्रमाणात घटला आहे.
महत्वाच्या शस्त्रक्रियांवेळी रुग्णांना रक्ताची अडचण येण्याची शक्यता आहे. एम.आय.एम.ई.आर.वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगांव ग्रामीण रुग्णालयाचे गरवारे रक्त केंद्र यांनी आवाहन केले आहे कि जास्तीत जास्त रक्तदान करा. या अवघड पण अशक्य नसलेल्या मोहिमेत विविध सामाजिक संघटना, छोट्या नागरी वस्त्या यांचा सहभाग मिळविण्यासाठी पदाधिकारी यांनी आवाहन करावे व त्या प्रमाणे आमच्या गरवारे रक्त केंद्रास कळवावे. जेणेकरून अशा शिबिरामध्ये आवश्यक तेवढे रक्त संकलन होऊन गरीब, गरजू रुग्णांच्या सेवेत मोलाचे योगदान दिले जाईल.
संपर्क :
एम.आय.एम.ई.आर.वैद्यकीय महाविद्यालय, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगांव ग्रामीण रुग्णालयाचे गरवारे रक्त केंद्र, तळेगांव दाभाडे, ता.मावळ, जि.पुणे-४१०५०७. (महाराष्ट्र राज्य) फोन : ०२११४-३०८३९९
डॉ. विजयकुमार पोवार (एम.डी. शरीर विकृती शास्त्र.) – रक्त संक्रमण अधिकारी फोन : ९६०४८ ७१४७१
राहुल पंढरीनाथ पारगे – जनसंपर्क अधिकारी फोन : ९९६०० ८९०८९