Pm
कोरोना देश राजकारण

मोठी घोषणा; कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना नि:शुल्क शिक्षण, १० लाख रुपये आर्थिक मदत, मोफत आरोग्य विमा आणि बरेच काही…

नवी दिल्ली : कोरोना महामारीमुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. नि:शुल्क शिक्षणासह त्या मुलांच्या वयाच्या २३ व्या वर्षी १० लाख रुपये आर्थिक मदतही दिली जाणार आहे. तसेच मुलांना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल. हा सर्व खर्चा पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन फंडातून केला जाणार आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटमध्ये लिहितात कि, कोरोनामुळे आपले आई-वडिल गमावलेल्या सर्व मुलांना पीएम-केअर्स फॉर चिल्ड्रन योजनेतून मदत केली जाईल. सरकारला या मुलांची काळजी आहे आणि या मुलांना आयुष्यात प्रतिष्ठा आणि संधी देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. या मुलांना त्यांच्या वयाच्या १८ व्या वर्षीपासून मासिक स्टायपेंड आणि २३ व्या वर्षी पीएम केअर्समधून १० लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या मुलांचे शिक्षण आणि त्यांना अन्य मदतीची हमी देईल.

तसेच अनाथ झालेल्या सर्व मुलांना नि:शुल्क शिक्षण दिलं जाईल. ज्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचं असेल, त्यांना सरकार कर्जासाठी मदत करेल. या कर्जावरील व्याजाची परतफेड पीएम केअर्स फंडातून केली जाईल. याव्यतिरिक्त आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून १८ वर्षांपर्यंतच्या मुलांना पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल आणि त्याचा प्रिमीयम देखील पीएम केअर्स फंडाद्वारे भरला जाईल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत