lakhimpur kheri incident supreme court ask for detailed status report up government

लखीमपूर खेरी हिंसा : अखेर आशिष मिश्रा याला समन्स जारी, SC च्या कठोर भूमिकेनंतर पोलिस सक्रिय

देश राजकारण

लखीमपूर : केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, आशिष पांडे आणि लव कुश यांना उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराप्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. दोघांची चौकशी केली जात आहे. या घटनेत आशिष पांडे आणि लव कुश यांचाही सहभाग होता आणि दोघेही जखमी झाले होते. आयजी रेंजकडून दोघांची चौकशी सुरु आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

लखीमपूर खेरी प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयानेही कठोर भूमिका घेतली आहे. त्यामुळे यूपी पोलिसांची सक्रियता वाढताना दिसत आहे. कनिष्ठ केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाची पोलीस प्रथमच चौकशी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी अटक आणि कारवाईबाबत स्पष्टीकरण मागितल्यानंतर हे समन्स बजावण्यात आले. राज्य पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, आशिष मिश्रा याची शक्य तितक्या लवकर चौकशी केली जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल.

लखीमपूर खेरी प्रकरणात आतापर्यंत किती जणांना अटक? सर्वोच्च न्यायालयाने मागितले स्पष्टीकरण

दरम्यान, पोलिसांनी आशिष पांडे आणि लव कुश नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे. जीप थार मागून येणाऱ्या वाहनात दोघेही उपस्थित असल्याचा आरोप आहे. आशिष मिश्रा याला देखील पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यात जीप थार काही लोकांना चिरडत पुढे जात असल्याचे दिसत आहे. पोलिसांना घटनास्थळावरून रिकामी काडतुसेही सापडली आहेत. त्यांची फॉरेन्सिक तपासणी केली जाईल. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर राजकारणही तीव्र झाले आहे, तसेच भाजप खासदाराच्या मुलाच्या अटकेची मागणीही तीव्र झाली आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत