काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी देशात वाढत जाणाऱ्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्रातील मोदी सरकार हे भारताचे भविष्य धोक्यात घालत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी ट्विट करत म्हटलं आहे कि, मोदी सरकार भारताचे भविष्य धोक्यात घालत आहे. तसेच सरकार अहंकारामुळे अस्सल चिंतांकडे दुर्लक्ष करीत असून यामुळे ते जेईई-नीटसाठी (JEE-NEET) इच्छुक असणाऱ्यांकडे देखील दुर्लक्ष करत आहेत. या बरोबरच एसएससी आणि इतर परीक्षा घेण्याकडेही हे सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत ‘नोकऱ्या द्या, पोकळ घोषणा नकोत’, असा घणाघातही राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केला आहे.
Modi Govt is jeopardising India’s future.
Arrogance is making them ignore the genuine concerns of the JEE-NEET aspirants as well as the demands of those who took SSC and other exams.
Give jobs, not empty slogans.#SpeakUpForSSCRailwayStudents
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 1, 2020




