abhijeet kelkar purnima dey
कोरोना मनोरंजन

‘सिंगिंग स्टार’च्या सहा कलाकारांना कोरोनाची लागण

‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘सिंगिंग स्टार’चे स्पर्धक असलेले अभिनेता अभिजीत केळकर आणि अभिनेत्री पौर्णिमा डे यांच्यासह ‘सिंगिंग स्टार’च्या सहा कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

अभिजीत केळकरने आतापर्यंत अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. तो ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वाचा स्पर्धकही होता. सध्या तो ‘सिंगिंग स्टार’ या सेलिब्रिटी सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये सहभागी झाला आहे. सिंगिंग स्टार’ शो मधील अभिजीतची सहस्पर्धक आणि ‘तुला पाहते रे’ फेम अभिनेत्री पौर्णिमा डे हिलाही कोरोनाची लागण झाली आहे. तर अभिनेत्री स्वानंदी टिकेकरचा मेंटॉर असलेला गायक रोहित राऊत आणि अभिनेता अंशुमन विचारेची मेंटॉर असलेली गायिका जुईली जोगळेकर यांनाही कोरोना संसर्ग झाला आहे. तसेच दोन क्रू मेम्बर्सना कोरोना झाला आहे. त्यामुळे ‘सोनी’वरील सिंगिंग स्टार शोचे शूटींग दहा दिवसांसाठी थांबवले असल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

अभिजीत केळकरने याविषयी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे.

 

View this post on Instagram

 

…नमस्कार, सर्व प्रकारची काळजी घेऊनही मला कोरोना ची लागण झाली… माझी फक्त पाठ दुखत होती ह्या व्यतिरिक्त मला आणखी काहीही होत नव्हतं किंवा सर्दी,खोकला, ताप अशी कुठलीही लक्षणही नव्हती… डॉक्टरांना विचारल्यावर त्यांनी टेस्ट करून घ्यायला सांगितली जी पॉझिटिव्ह आली… त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी व्यवस्थित ट्रीटमेंट घेत आहे आणि आता माझी तब्येत उत्तम आहे… माझी बायको तृप्ती आणि राधा- मल्हार सगळे ठणठणीत आहेत… तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच कायम पाठीशी असू देत धन्यवाद…

A post shared by Abhi Kelkar (@abhijeetkelkarofficial) on

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत