shekhar gawali
क्रीडा

दरीत पडलेले माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला

ट्रेकिंगदरम्यान पाय घसरुन दरीत पडलेले माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला आहे. रेस्क्यू टीमला आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दरीत त्यांचा मृतदेह आढळला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

शेखर गवळी हे नाशिकच्या इगतपुरी परिसरात काही सहकाऱ्यांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यावेळी पाय घसरुन ते थेट दरीत कोसळले. मंगळवारी (1 सप्टेंबर) संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती. गवळी यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ स्थानिकांच्या तसेच आपत्कालीन यंत्रणांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला. मात्र त्यांचा शोध लागत नव्हता. अंधार झाल्याने रेस्क्यू ऑपरेशन थांबवले.

बुधवारी सकाळी तीन तासाच्या शोधानंतर गवळी यांचे पार्थिव हाती लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
शेखर गवळी हे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. या दुर्घटनेने क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत