indian tennis star sumit nagal
क्रीडा

यूएस ओपन मध्ये भारताचा टेनिस स्टार सुमित नागलने रचला इतिहास

भारताचा 23 वर्षीय टेनिस स्टार सुमित नागलने इतिहास रचला आहे. गेल्या सात वर्षात यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश करणारा तो पहिलाच भारतीय ठरला. नागलचा दुसर्‍या फेरीत पुढचा सामना ऑस्ट्रियाच्या डॉमिनिक थीम किंवा स्पेनच्या जौम मुनारशी होईल. याआधी, सोमदेव देववर्मनने 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला होता.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

यूएसचा प्रतिस्पर्धी ब्रॅडले क्लान याला मंगळवारी (1 सप्टेंबर)पराभवाची धूळ चारत नागलने यूएस ओपनच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. 6-1, 6-3, 3-6, 6-1 अशा सेटमध्ये सुमित नागलने विजय मिळवला. नागलने क्लानविरुद्ध सामन्याच्या सुरुवातीच्या दोन सेटमध्ये 6-1, 6-3 असा धमाकेदार विजय मिळवला. मात्र तिसऱ्या सेटमध्ये, क्लानने नागलवर मात केली आणि सामना उत्कंठावर्धक स्थितीत आला. त्यानंतर सुमितने पुन्हा चौथ्या सेटमध्ये बाजी मारत 6-1 अशी आघाडी मिळवली. सुमित गेल्या सात वर्षांत ग्रँड स्लॅम एकेरीतील मुख्य सामना जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत