IND vs AUS 3rd T20 : Australia gave India a target of 187

ऑस्ट्रेलियाचे भारतासमोर 187 धावांचे आव्हान, मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना…

क्रीडा

हैदराबाद : ऑस्ट्रेलियाने भारताला 187 धावांचे लक्ष्य दिले आहे. ग्रीन आणि डेव्हिड यांनी अर्धशतक केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आज हैदराबादमध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या T20 सामन्यात आमनेसामने आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये एक बदल केला, ऋषभ पंतला आज संधी मिळाली नाही, तर भुवनेश्वर कुमार परतला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तीन सामन्यांची ही मालिका एक-एक अशी बरोबरीत असून मालिकेतील हा शेवटचा आणि निर्णायक सामना आहे. ऑस्ट्रेलियानेही आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. शॉन ऍबॉटच्या जागी जोश इंग्लिसला संधी दिली आहे. नाणेफेक जिंकणे आज भारतासाठी फायद्याचे ठरू शकते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत