rashid khan emotional appeal on social media

अफगाणिस्तानच्या लोकांना मारणे थांबवा, राशिद खानचे भावनिक आवाहन…

क्रीडा

अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. गुरुवारी काबूल विमानतळाबाहेर तीन स्फोट झाले, ज्यात आतापर्यंत 103 लोकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे दुःखी झालेल्या राशिदने एक ट्वीट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

राशिदने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले कि, “काबूलमध्ये पुन्हा रक्त वाहत आहे. कृपया, अफगाणिस्तानच्या लोकांना मारणे थांबवा.” राशिद सध्या आपल्या कुटुंबापासून दूर आहे. त्याचे कुटुंब अफगाणिस्तानमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. राशिद खानचे हे ट्वीट आतापर्यंत १4 हजारांहून अधिक वेळा रिट्वीट करण्यात आले आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत