IPL 2020: Today's final match between Mumbai Indians and Delhi Capitals
क्रीडा

IPL 2020 : आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार फायनल मैच

आयपीएल २०२० चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज सायंकाळी ७.30 वाजता खेळला जाईल. दिल्ली कॅपिटल्स आज आयपीएलमध्ये आपली पहिली फायनल मॅच खेळेल. दिल्ली समोर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आव्हान आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई सहाव्या वेळी अंतिम सामना खेळेल. मुंबईने 4 वेळा (2013, 2015, 2017, 2019) विजेतेपद मिळवले आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दिल्ली कॅपिटल्स त्यांचे पहिले जेतेपद मिळवण्यासाठी इच्छूक आहे. शिखर धवन ह्या हंगामात 500+ धावा बनवणाऱ्या तीन फलंदाजांपैकी एक आहे. धवनने चेन्नई आणि पंजाबविरुद्ध सलग दोन (१०१, १०6) नाबाद शतके लगावली होती. मात्र ह्या हंगामात दिल्लीची ताकद गोलंदाजी राहिली.

मुंबईच्या प्लेइंग -११ मध्ये ७ क्रमांकापर्यंत उत्तम फलंदाजी करू शकतात. रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक आणि सूर्यकुमार यादव यासारखे फलंदाज आहेत. अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक आणि क्रुणाल पांड्या तसेच केरॉन पोलार्डही आहेत. आज अष्टपैलू खेळाडू जयंत यादव मुंबईच्या संघात दीपक चहरच्या जागी येऊ शकतो. असे झाल्यास मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आठवा फलंदाज आणि उत्कृष्ट राइट-आर्म ऑफ स्पिनर संघाला लाभेल.

या मोसमातील टॉप-३ गोलंदाजांमध्ये मुंबईचे २ आणि दिल्लीचा एक गोलंदाज आहेत. लिस्ट मध्ये दिल्लीच्या कागिसो रबाडाने 29 विकेट्ससह प्रथम क्रमांकावर स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर मुंबईचा जसप्रीत बुमराह 27 विकेट घेऊन दुसर्‍या स्थानावर आणि ट्रेंट बोल्ट 22 विकेटसह तिसर्‍या स्थानावर आहे.

आयपीएलमध्ये मुंबईने आतापर्यंत दिल्लीविरुद्ध 27 सामने खेळले आहेत. त्यातील 15 सामन्यांत जिंकले तर १२ सामन्यांत पराभूत झाले आहेत. या हंगामात आतापर्यंत दोघांमध्ये 3 सामने खेळले गेले आहेत. तिन्ही सामन्यांत मुंबईने दिल्लीचा पराभव केला. याआधी क्वालिफायर -२ मध्ये दोन्ही संघांमध्ये सामना खेळला गेला, त्यात मुंबईने 57 धावांनी विजय मिळवला होता.

दुबईतील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकेल. येथे स्लो विकेट असल्याने स्पिनर्सनाही खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणार्‍या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत