Devendra Fadnavis
अमरावती महाराष्ट्र

जिल्हा स्त्री रूग्णालयातील आगीच्या घटनेबाबत चोवीस तासांत अहवाल सादर करा, उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

अमरावती : जिल्हा स्त्री रूग्णालयातील नवजात शिशु अतिदक्षता केंद्रातील आगीच्या घटनेबाबत २४ तासांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून समिती गठित करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

जिल्हा स्त्री रूग्णालयातील शिशु दक्षता केंद्रात व्हेंटिलेटर मशिनला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. व्यवस्थापनाने अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. केंद्रातील १२ नवजात बालकांना तातडीने विशेष संदर्भ रूग्णालय व इतर रूग्णालयात हलविण्यात आले. घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही किंवा कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

घटनेबाबत माहिती मिळताच उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी तत्काळ जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. याप्रकरणी समिती गठित करून चौकशी करण्याचे व तसा अहवाल २४ तासांत सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. त्यानुसार जिल्हाधिका-यांनी स्वतंत्र आदेश निर्मगित करून जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. अमरावतीचे तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, महापालिकेचे अग्निशमन अधिकारी, स्त्री रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक आदी समितीचे सदस्य आहेत. समितीने चोवीस तासांत आदेश अहवाल सादर करण्याचे आदेश आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत