दिल्ली : दिल्लीतील सीलमपूर भागात एका अल्पवयीन मुलावर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. १२ वर्षीय मुलाला त्याच्या तीन मित्रांनी आणि एक शेजाऱ्याने मिळून मारहाण केली. नंतर 4 जणांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले, नंतर मारहाण करून त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घातला, असे दिल्ली महिला आयोगाने रविवारी सांगितले. एलएनजेपी रुग्णालयात सध्या गंभीर अवस्थेत असलेल्या अल्पवयीन मुलाने घटनेच्या चार दिवसांनंतर गुरुवारी त्याच्या पालकांना घटनेची माहिती दिली. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून 3 आरोपी अद्याप फरार आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 18 सप्टेंबरची ही घटना सीलमपूर भागातील आहे. 22 सप्टेंबर रोजी मुलाच्या पालकांना घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. दिल्ली महिला आयोगाच्या (डीसीडब्ल्यू) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी रविवारी याबाबत खुलासा केला आहे. स्वाती मालीवाल यांनी सीलमपूरच्या एसएचओला पत्र लिहून सांगितले की, तक्रारदाराने सांगितल्यानुसार तिच्या 12 वर्षांच्या मुलावर 18 सप्टेंबर रोजी चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आणि त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉडही घातला. त्यांनी त्याला विटा आणि रॉडने बेदम मारहाणही केली. त्यानंतर तातडीने दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली.
अल्पवयीन मुलगा सध्या अत्यंत गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहे. ही घटना “अत्यंत गंभीर बाब” असल्याचे सांगून मालीवाल यांनी एफआयआरची प्रत, आरोपींची माहिती आणि 28 सप्टेंबरपर्यंत या प्रकरणावरील अहवालाचा तपशील मागितला. DCW प्रमुखाने ट्विटरवर पीडित मुलाची अस्पष्ट छायाचित्रे शेअर केली आणि म्हटले की राष्ट्रीय राजधानीत मुली तर सोडा, मुलंही सुरक्षित नाहीत. एक 12 वर्षांचा मुलगा, त्याच्यावर चार जणांनी क्रूरपणे बलात्कार केला आणि मारहाण केल्यानंतर अर्धमेल्या अवस्थेत सोडले. आमच्या टीमने या प्रकरणी एफआयआर नोंदवला.”
दिल्ली में लड़की तो क्या लड़के भी सुरक्षित नहीं हैं। एक 12 साल के लड़के के साथ 4 लोगों ने बुरी तरह से रेप किया और डंडों से पीटकर अधमरी हालत में छोड़कर चले गए। हमारी टीम ने मामले में FIR दर्ज करवाई। 1 आरोपी गिरफ़्तार, 3 अब भी फ़रार, दिल्ली पुलिस को नोटिस जारी कर रही हूँ। pic.twitter.com/tXrqK7xkwm
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) September 25, 2022
दरम्यान, नोटीस दिल्यानंतर काही वेळातच, दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटले आहे की पोलिसांचे पथक रुग्णालयात पोहोचले आणि त्यांनी मुलाच्या पालकांची भेट घेतली. परंतु त्यांनी निवेदन देण्यास नकार दिला. मूल वैद्यकीय निरीक्षणाखाली होते. पोलिसांनी सांगितले की, 24 सप्टेंबरपर्यंत अल्पवयीन मुलाच्या कुटुंबीयांनी जबाब दिला नाही, तथापि, तपास अधिकारी नियमितपणे त्यांच्याशी संपर्क साधत होते. शनिवारी “सखी” संस्थेच्या समुपदेशकाची पोलिसांकडून व्यवस्था करण्यात आली आणि जखमी मुलाच्या आईचे समुपदेशन करण्यात आले. विस्तृत समुपदेशनानंतर, आईने खुलासा केला की तीन दिवसांपूर्वी म्हणजे 18.09.22 रोजी, तिच्या मुलावर त्याच्या तीन मित्रांनी शारिरीक हल्ला केला आणि लैंगिक अत्याचार केले.”
त्यानंतर आयपीसीच्या कलम 377/34 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि तपास हाती घेण्यात आला. तपासादरम्यान असे आढळून आले की, पीडित मुलगा आरोपींना ओळखत होता, सर्व 10-12 वर्षे वयोगटातील आणि त्याच समुदायातील त्याचे मित्र आणि शेजारी होते. आरोपींपैकी एक अल्पवयीन मुलाचा चुलत भाऊही आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलास बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले आहे, तर अन्य तीन जण अद्याप फरार आहेत.




