55-year-old woman gang-raped in Greater Noida

55 वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार, पीडितेला रक्ताच्या थारोळ्यात सोडून गुन्हेगार फरार

क्राईम देश

ग्रेटर नोएडा: ग्रेटर नोएडाच्या जेवर गावात एका 55 वर्षीय महिलेवर चार जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सध्या महिलेची प्रकृती गंभीर परंतु स्थिर आहे. पीडित महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तिच्यावर नोएडाच्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला शेतात चारा कापण्यासाठी गेली होती. तेव्हा या चार आरोपींची तिच्यावर नजर पडली. महेंद्र नावाचा मुख्य आरोपी त्याच्या मित्रांसह तिथे जनावरांना चारायला घेऊन गेला होता. मुख्य आरोपी ड्रग ऍडिक्ट असल्याचा पोलिसांना संशय आहे. आरोपी महेंद्र याने त्याच्या तीन साथीदारांसह 55 वर्षीय महिलेवर अत्याचार केले. यावेळी महिला जखमी झाली आणि तिच्या प्रायव्हेट पार्टमधून जास्त रक्तस्त्राव झाला. त्यानंतर पीडित महिला बेशुद्ध पडल्यानंतर गुन्हेगार घटनास्थळावरून पळून गेले. महिलेने नंतर तिच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या महिलेवर शस्त्रक्रिया करावी लागली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची प्रकृती चिंताजनक आहे पण ती स्थिर आहे. ही महिला नोएडाच्या जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. आरोपींना पकडण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. स्थानिक पोलिसांच्या पथकानेही घटनास्थळी जाऊन पुरावे गोळा केले. तिन्ही टीम आरोपींना पकडण्यासाठी कार्यरत आहेत. पीडिता एका आरोपीला ओळखत होती. गावकऱ्यांपैकी काहींचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. आरोपी लवकरच पकडले जातील.”

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत