आपल्या संसदीय मतदार संघ वायनाड येथील दौऱ्यावर असलेले कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी यांनी तीनही कृषी कायद्यांचा विरोध केला. ते म्हणाले, सत्य हे आहे की बहुतेक शेतकऱ्यांना तिन्ही कृषी कायद्यांचे तपशील समजत नाहीत, कारण जर त्यांना हे समजले तर संपूर्ण देशात आंदोलन केले जाईल, देशात सर्वत्र आग लागेल.
बुधवारी राहुल गांधींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे निवेदन ट्वीट करून तीनही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी केली. महात्मा गांधींचे विधान ‘तुम्ही विनम्रपणे जगाला हलवू शकता’, राहुल यांनी ट्विट केले. राहुल गांधी यांनी पुढे लिहिले की, पुन्हा एकदा मोदी सरकारला आवाहन करतो कि कृषी-विरोधी कायदा त्वरित मागे घ्यावा.




