निशिकांत कामत यांनी सोमवारी सायंकाळी हैदराबादमधील खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून निशिकांत यांना यकृताचा आजार होता, त्यांचं हेच दुखणं पुन्हा एकदा बळावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
डोंबिवली फास्ट या चित्रपटाचं दिग्दर्शन निशिकांत कामत यांनी केलं होत. त्यानंतर, दृष्यम, मदारी, मुंबई मेरी जान यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटातून निशिकांत कामत यांनी आपला ठसा बॉलिवूडमध्ये उमटवला.
मराठीसह हिंदी सिनेमाच्या माध्यमातून आपल्या दिग्दर्शनाची छाप सोडणारे निशिकांत कामत यांच्या निधनानं बॉलिवूडसह त्यांचे चाहतेही हळहळले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही कामत यांच्या निधनावर आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. दिग्दर्शक निशिकांत कामत यांच्या निधनानंतर राज ठाकरे यांनी ट्विट करत आपला शोक व्यक्त केला.
#निशिकांतकामत #दिग्दर्शक #चित्रपट #NishikantKamat #IndianCinema pic.twitter.com/tsYLJQMXNU
— Raj Thackeray (@RajThackeray) August 17, 2020
निशिकांतच्या जाण्याने मी एक चांगला मित्र गमावलाच पण सिनेमावर भरभरून बोलणारा एक रसिक देखील गमावला.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निशिकांतला भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला.




