माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे निधन

कोरोना महाराष्ट्र

माजी आमदार आणि एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांचं सोमवारी रात्री निधन झालं. ते ८६ वर्षाचे होते.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सुधाकरपंत परिचारक यांना करोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सुरुवातीला पंढरपुरात उपचार करण्यात येत होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती. मात्र काल संध्याकाळी अचानक त्यांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होऊ लागला, त्यातच त्यांना श्वास घेण्यासही त्रास होऊ लागल्याने त्यांची प्रकृती बिघडली होती. अखेर काल रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

सुधाकरपंत परिचारक यांना एकेकाळी पवारांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जायचे. ते पाच वेळा पंढरपूरमधून आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कामही पाहिले होते. यंदा त्यांनी भाजपकडून निवडणूक लढवली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. सहकारी संस्था आणि सहकारी बँका त्यांनी यशस्वीपणे चालविल्या. त्यांना आजारी कारखान्यांचे डॉक्टरही म्हटलं जाई. त्यांच्या निधनामुळे ज्येष्ठ आणि अनुभवी लोकनेता हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत