अमेरिका आणि कॅनडामध्ये कांद्यांत सापडले जिवाणू, जवळपास ५०० जण हॉस्पिटलमध्ये

ग्लोबल

अमेरिका आणि कॅनडा येथे थॉमसन इंटरनॅशनल कंपनीने पुरवलेल्या कांद्याचे सेवन केलेल्या नागरिकांना पोटदुखी आणि जुलाबांचा त्रास सतावत आहे. आतापर्यंत जवळपास ५०० जणांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची वेळ आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

दरम्यान, थॉमसन इंटरनॅशनल कंपनीच्या कांद्यात साल्मोनेला जिवाणू आढळला आहे. हा जिवाणू माणसाच्या पचनसंस्थेवर परिणाम करतो. सतत जुलाब होत असल्यामुळे अशक्तपणा जाणवत असल्याच्या तसेच ताप आल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या आहेत. कांद्यामुळे माणसं आजारी पडू लागल्यामुळे अमेरिका आणि कॅनडामध्ये भीतीचे वातावरण आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून अमेरिका आणि कॅनडा सरकारने नागरिकांना थॉमसन इंटरनॅशनल कंपनीचे कांदे खाणे टाळा असा सल्ला दिला आहे. जिवाणू शरीरात प्रवेश केल्यानंतर चार ते आठ तासांमध्ये पचनसंस्थेवर परिणाम करतो. नंतर हा जिवाणू शरीराच्या इतर अवयवांना निकामी करण्याचाही धोका आहे. प्राथमिक तपासातून आढळले कि, साल्मोनेला जिवाणू शरीरात प्रवेश करुन सक्रीय झाल्यानंतर आठवडाभर माणसाला त्रास देऊ शकतो.

अद्याप साल्मोनेला जिवाणूची बाधा झाल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती हाती आलेली नाही. मात्र ज्यांना रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, किडनीचे विकार असा एखादा गंभीर आजार आहे अशांसाठी हा जिवाणू प्राणघातक ठरण्याचा धोका आहे. अमेरिका आणि कॅनडा सरकारने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. जिवाणू कांद्यात कसा पोहोचला याचा तपास सुरू आहे. तातडीचा उपाय म्हणून साल्मोनेला जिवाणूबाधीत कांदा नष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

साल्मोनेला जिवाणू प्राण्यांच्या शरीरात असतो. मांसाहार घेतल्यामळे प्राण्यांच्या आतड्यातला साल्मोनेला जिवाणू माणसाच्या आतड्यापर्यंत जाऊन पोहोचतो. माणसाची पचनक्षमता प्राण्यांच्या तुलनेत कमकुवत असते, त्यामुळे तो माणसांसाठी धोक्याचा ठरतो. अमेरिका आणि कॅनडात कांद्यातून साल्मोनेला जिवाणू माणसांच्या शरीरात प्रवेश करत असल्याने, या प्रकरणी तपास सुरू आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत