bomb blast near mosque in peshawar of pakistan

पेशावर येथील मशिदीत आत्मघाती स्फोट, ४५ ठार; 65 जखमी

ग्लोबल

पाकिस्तानातील पेशावर येथील मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी एका व्यक्तीने स्फोट करून स्वत:ला उडवले. या आत्मघातकी स्फोटात 45 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ६५ हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णवाहिकेतून लेडी रीडिंग रुग्णालयात नेण्यात आले. या दुर्घटनेनंतर घटनास्थळी किमान 15 रुग्णवाहिका हजर आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मशिदीत शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी बॉम्बस्फोट झाल्याची घटना घडली. पेशावरमधील मशिदीत त्यावेळी गर्दी होती, अचानक गर्दीतील एका व्यक्तीने स्फोट करून स्वत:ला उडवले. स्फोटापूर्वी गोळीबाराचा आवाजही ऐकू आला होता. या स्फोटामागे कोणाचा हात आहे याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पोलिसांचे पथक स्फोटाच्या ठिकाणी पोहोचले आहे. या परिसरात अनेक बाजारपेठा आहेत आणि हे ठिकाण सहसा शुक्रवारच्या नमाजाच्या वेळी खचाखच भरलेले असतात.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत