If the Maha Vikas Aghadi government had not been formed, Jayant Patil would have been in the BJP

नारायण राणे आणि नितेश राणे उद्या मुंबई पोलिसांसमोर हजर होणार

महाराष्ट्र मुंबई

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे उद्या मुंबई पोलिसांसमोर हजर होणार आहेत. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन यांच्यावर कथित बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा आमदार नितेश राणे उद्या उपनगर मालवणी येथे मुंबई पोलिसांसमोर हजर होणार आहेत.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की याआधी उपनगर मालवणी पोलिसांनी नोटीस पाठवून भाजपचे आमदार नितेश राणे यांना गुरुवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्यास सांगितले होते. तर त्यांचे वडील आणि भाजप नेते नारायण राणे यांना शुक्रवारी हजर राहण्यास सांगितले होते. परंतु या दोघांच्या वकिलांनी सांगितले की, महाराष्ट्र विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने ते शनिवारी पोलिसांसमोर हजर होतील. त्यानुसार शनिवारी दुपारी एक वाजता नारायण राणे आणि नितेश राणे या दोघांचे जबाब नोंदवले जातील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत