mother threw her 6 minor children in well in Raigad
महाराष्ट्र

आईचा सहा मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्येचा प्रयत्न, मुलांचा दुर्दैवी अंत…

रायगड : रायगड जिल्ह्यात एक अतिशय खळबळजनक घटना घडली आहे. जन्मदात्या आईने टोकाचं पाऊल उचलत आपल्या सहा मुलांना विहिरीत ढकलून दिलं. त्यानंतर महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेत या चिमुकल्यांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. महिलेनं कौटुंबिक वादातून हे कृत्य केल्याची माहिती मिळाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील बोरवाडी गावात सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील मृतांमध्ये पाच मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. महिलेला सासरच्यांकडून मारहाण करण्यात आली. त्यामुळे राग अनावर झालेल्या महिलेनं हे भयंकर कृत्य केलं. रुना चिखुरी सहानी (वय ३०) असं या महिलेचं नाव आहे. तर रोशनी चिखुरी सहानी (वय १०), करिष्मा चिखुरी सहानी (वय ८), रेश्मा चिखुरी सहानी (वय ६), विद्या चिखुरी सहानी (वय ५), शिवराज चिखुरी सहानी (वय ३) आणि राधा चिखुरी सहानी (वय 1) अशी मृत मुलांची नावं आहेत.

मुलांना विहिरीत ढकलून दिल्यानंतर महिलेने देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला वाचवण्यात यश आलं आहे. घटनेची माहिती मिळताच महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत