Phd, Master's Degrees Not Valuable Say Taliban Education Minister

तालिबानने केला शिक्षण क्षेत्रात बदल, सरकारमधील कोणाकडेही पदवी नाही त्यामुळे पदवीचे काही महत्त्व नाही

ग्लोबल

काबूल : तालिबानने अफगाणिस्तानमधील अंतरिम सरकारची घोषणा केली आहे, मंगळवारी संंध्याकाळी तालिबानने आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर शरियत लागू झाल्याची घोषणा केली आहे. शिक्षण क्षेत्रातही बदल करण्यास सुरूवात केली आहे. आता तालिबानच्या शिक्षण मंत्र्याने शेख मौलवी नूरल्लाह मुनीर याने म्हटले आहे की सध्याच्या काळात पीएचडी, पदव्युत्तर पदवीचे काही महत्त्व नाही.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

तालिबानने सत्ता हाती घेतल्यानंतर शिक्षण क्षेत्रात बदल करण्यास सुरूवात केली आहे. एकाच वर्गात मुले आणि मुली शिक्षण घेत असल्यास त्या वर्गात पडदे लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी मुलींना फक्त ज्येष्ठ अथवा महिला शिक्षिकांकडून शिक्षण दिले जात आहे. तालिबानचे शिक्षण मंत्री शेख मौलवी नूरल्लाह मुनीर याने म्हटले की, आज मौलवी आणि तालिबान सरकारमध्ये आहे. सरकारमधील कोणाकडेही पदवी नाही. मात्र, त्यांचे काम खूप मोठे आहे. त्यामुळे सध्याच्या काळात पीएचडी, अथवा पदव्युत्तर पदवीच्या शिक्षणाची आवश्यकता नाही. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये इस्लामिक आणि शरिया कायद्यानुसार शिक्षण देणार असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय आधुनिक शिक्षणही देण्यात येणार आहे. देशातील शैक्षणिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे तालिबानने म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारी संंध्याकाळी तालिबानने आपल्या मंत्रिमंडळाची घोषणा केली. मुल्ला मोहम्मद हसन अखुंद हा तालिबानी सरकारचा पंतप्रधान असणार आहे. तर, मोस्ट वॉन्टेड सिराज हक्कानी हा गृहमंत्री असणार आहे. तर, अब्दुल गनी बरादर हा उपपंतप्रधान असणार आहे. खैरउल्लाह खैरख्वा हा माहिती प्रसारण मंत्री असणार आहे. अब्दुल हकीम याच्याकडे न्याय मंत्रालयाची जबाबदारी असणार आहे. तालिबानचा प्रवक्ता जबिउल्लाह मुजाहिद हा माहिती मंत्रालयाचा उपमंत्री असणार आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत