baby is crushed by lift
ग्लोबल

भयंकर! दरवाजा बंद होण्याआधीच लिफ्ट सुरु झाली, आईने बाळाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण…

पॅरिस : लिफ्टमध्ये अडकून एका बाळाचा आईच्या डोळ्यासमोर मृत्यू झाला. ही घटना तेव्हा घडली जेव्हा महिला आपल्या बाळाला घेऊन लिफ्टमध्ये प्रवेश करत होती. मात्र, दरवाजा बंद होण्यापूर्वीच लिफ्ट वरच्या मजल्यावर जाऊ लागली आणि बाळ लिफ्टमध्ये अडकून चिरडले गेले. महिलेने बाळाला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, परंतु, ती बाळाला वाचवू शकली नाही आणि बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

वृत्तानुसार, गुलपेरी करसाल ही महिला आपल्या नवजात बाळाला प्रॅममध्ये घेऊन बाहेर जाण्यासाठी निघाली होती. यावेळी अपार्टमेंटची लिफ्ट उघडताच तिने आत जाण्याचा प्रयत्न केला, पण तिला आत जाण्यापूर्वीच लिफ्ट वरच्या दिशेने जाऊ लागली. त्यामुळे लिफ्टबरोबर प्रॅम देखील वरती जाऊ लागली आणि प्रॅम भिंत आणि लिफ्ट दरम्यान अडकली. महिलेने प्रॅम पकडून खाली खेचण्याचा प्रयत्न केला, पण तिला यश आले नाही. यानंतर बाळ अचानक लिफ्टच्या शाफ्टवरून सुमारे 20 फूट खाली पडले. गुलपेरी करसाल हिने कसेबसे बाळाला रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत बाळाचा मृत्यू झाला होता. ही भीषण घटना इमारतीत लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अपघाताच्या वेळी, गुलपेरी करसालने आजूबाजूच्या फ्लॅटमधून मदत मागितली, पण बाळाला वाचवता आले नाही. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत