The bomb of World War II detonated eight decades later

तब्बल आठ दशकांनंतर फुटला दुसर्‍या महायुद्धातील बॉम्ब.. पहा थरारक व्हिडीओ…

ग्लोबल

लंडन : इंग्लंडच्या एक्स्टर शहरात तब्बल आठ दशकांनंतर दुसर्‍या महायुद्धातील बॉम्ब आढळला. त्यानंतर इंग्लंडमधील एक्स्टर शहर रिकामे करण्यात आले होते. दुसऱ्या महायुद्धातील या महाविनाशक बॉम्बला रविवारी निकामी करण्यात आले. रिमोट कंट्रोल द्वारे या बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की काही किलोमीटर दूरपर्यंत असलेल्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

या बॉम्बची माहिती मिळताच, घटनास्थळावर बॉम्बशोधक पथक दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसर रिकामा केला. विद्यापीठातील १४०० विद्यार्थ्यांसह ग्लेनहॉर्न रोड भागातील जवळपास २६०० घरांतील नागरिकांना शुक्रवारी आणि शनिवारी या भागातून दूर जाण्यास सांगितले. रविवारी सायंकाळी सहा वाजून १० मिनिटांनी हा बॉम्ब निकामी करण्यात आला. यासाठी नियंत्रित स्फोट घडवण्यात आला. या स्फोटाचा आवाज १० किमी पर्यंत ऐकू आल्याची माहिती आहे.

हा बॉम्ब हिटलरच्या नाझी सैन्याने ब्रिटनच्या एक्स्टर शहरावर डागला होता, असे म्हटले जाते. एक्स्टर विद्यापीठाच्या परिसरात हा बॉम्ब आढळून आला. या स्फोटाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रॉयल नेव्ही बॉम्ब डिस्पोजल टीमच्या तज्ज्ञांनी नियंत्रित पद्धतीने हा स्फोट घडवून आणला.

दरम्यान, निवासी भागात ९०० किलो वजनाचा बॉम्ब सापडल्यानंतर आसपासच्या भागातही शोधमोहीम सुरु आहे. ब्रिटीश सुरक्षा संस्थांचा या भागात आणखी जिवंत बॉम्ब सापडतील असा अंदाज आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत