पुणे : ऑटो रिक्षा चालवणाऱ्या एका अल्पवयीन मुलाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे रिक्षा रेलिंगवर आदळून अपघात झाला. या अपघातात रितेश शिवाजी गायकवाड (वय १९) याचा मृत्यू झाला. रितेश कात्रजमधील गोकुळ नगर येथील रहिवासी होता. १५ एप्रिल रोजी पहाटे कात्रज-कोंढवा रस्त्यावरील पुलावर हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलगा १५ एप्रिल रोजी पहाटे ऑटो रिक्षा […]
टॅग: accident
पुण्यात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट, दोघांचा होरपळून मृत्यू
पुणे : पुण्यात एका पत्र्याच्या घरात गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन वडील आणि मुलाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील वारजे येथील माळवाडी, गोकुळ नगर परिसरात मंगळवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास हा स्फोट झाला. स्फोटानंतर आगीने रौद्र रूप धारण केल्याने परिसरात धावपळ उडाली. दरम्यान, अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी दाखल होत स्फोटात लागलेली आग विझवण्याचे […]
हृदयद्रावक! पाण्याच्या टँकरखाली चिरडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, चालकाला अटक
पुणे : पाण्याच्या टँकरच्या मागील चाकाखाली चिरडून एका १८ महिन्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. शनिवारी संध्याकाळी वारजे येथील गणपती माथा परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी टँकर टँकर चालक सनी प्यारे बारस्कर (वय ३३) याला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलाचे नाव अधोक्षक महेश वहाळे असे आहे, जो […]
ट्रॅक्टर मजुरांसह ६० फूट खोल विहिरीत कोसळला, सात महिला शेतमजूरांचा मृत्यू
हिंगोली : शेतमजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर थेट विहीरीमध्ये कोसळून भीषण अपघात झाला आहे. नांदेड शहरापासून दहा किलो मीटर दूर असलेल्या आलेगाव शिवारात हा अपघात झाला आहे. टॅक्टर साठ फूट खोल विहिरीत कोसळला असून विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्णपणे बुडाला आहे. ट्रॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे. या घटनेत सात महिला शेतमजूरांचा मृत्यू झाला आहे, तर काहीजण जखमी […]
अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूदचा समृद्धी महामार्गावर अपघात
मुंबई : अभिनेता सोनू सूदची पत्नी सोनाली सूदचा मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. सोनाली तिची बहीण आणि बहिणीचा मुलगा यांच्यासह होती. सोनालीची गाडी एका ट्रकला धडकली, पण सुदैवाने यात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. या अपघातात सोनाली सूद आणि तिच्या बहिणीचा मुलगा जखमी झाले आहेत. सध्या दोघांवरही नागपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात […]
पाणीपुरवठा करणाऱ्या टेम्पोखाली चिरडल्याने दोन वर्षांच्या मुलाचा मृत्यू
पुणे : पाणीपुरवठा करणाऱ्या टेम्पोखाली चिरडल्याने एका दोन वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला. लोणीकंदमध्ये ही दुःखद घटना घडली. टेम्पोचा चालक अल्पवयीन मुलगा असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अल्पवयीन चालक आणि त्याच्या वडिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मृत मुलाचे नाव मल्हार अक्षय चापोडे (वय २) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा टेम्पो सदर परिसरात पाणीपुरवठा […]
भयंकर! महिलेची ओढणी दुचाकीच्या साखळीत अडकली, हात निखळून झाला धडावेगळा…
उत्तर प्रदेश : झाशीमध्ये एक अतिशय भयंकर घटना घडली. महिलेची ओढणी दुचाकीच्या साखळीत अडकून तिचा हात धडावेगळा झाला. ही वेदनादायक घटना पाहून आजूबाजूला असलेले लोक हादरले. सध्या या महिलेला झाशी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरसरे, झाशी येथील रहिवासी जयराम अहिरवार हे सध्या आपल्या कुटुंबासह राजगड येथे राहतात. त्यांची मुलगी […]
जालन्यात बस आणि आयशर ट्रकचा भीषण अपघात, पाच ठार तर १५ जखमी
जालना : जालन्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. अंबडपासून १० किमीवर वडीगोद्री रोडवरील शहापूरजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात पाच जण जागीच ठार झाले असून १४ जण जखमी झाले आहेत. गेवराईहून अंबडकडे जाणाऱ्या बसने आयशर ट्रकला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती होती की बस आणि आयशर ट्रकचा चक्काचूर झाला आहे. […]
पुणे : कार खडकवासला धरणात कोसळल्याने १२ वर्षीय मुलीचा बुडून मृत्यू
सिंहगड : टायर फुटल्याने कार खडकवासला धरणात कोसळून एका १२ वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पुणे-पानशेत रस्त्यावरील कुरण बुद्रुक गावच्या हद्दीत टायर फुटल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट खडकवासला धरणाच्या पाण्यात कोसळली. या अपघातात संस्कृती प्रदीप पवार (वय 12, रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) […]
मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात, तिघांची प्रकृती गंभीर तर अनेक जण जखमी
पनवेल : मुंबई-गोवा महामार्गावर 2 बसची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. पनवेलजवळ ही घटना घडली. या अपघातात दोन्ही बसचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. यात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत, तर सुमारे १५ जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मुंबई-गोवा महामार्गावर […]