major accident in jalgaon
महाराष्ट्र

जळगावात ट्रक उलटून भीषण अपघात; 15 मजूर जागीच ठार

जळगाव : जळगावच्या यावल तालुक्यात किनगाव नजीक जवळ रविवारी रात्री भीषण अपघात झाला यात 15 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहिती नुसार, साधारण रात्री एक वाजताच्या सुमारास येथील यावल चोपडा रस्त्यावर असणाऱ्या एका वळणावर ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. पपई घेऊन हा ट्रक […]

Four killed in Pune-Bangalore National Highway accident
महाराष्ट्र

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वहागांव गावच्या हद्दीत अतिशय भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. भरधाव वेगाने जाणार्‍या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे घडलेल्या या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून कार (क्र. एम.एच. 07 ए.बी. 5610) ही […]

Father arrested for handing over car to minor
पुणे महाराष्ट्र

थरारक अपघात : अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देणं वडिलांना पडलं महागात, दोन जणांना अटक

पिंपरी चिंचवड : अल्पवयीन मुलाने सुसाट गाडी चालविल्याने पिंपरी चिंचवडमध्ये एक थरारक अपघात झाला. याचप्रकरणी आता या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना तुरुंगात जाण्याची वेळ आली आहे. सोबतच सर्व्हिसिंग सेंटरवरील एका व्यक्तीस देखील अटक झाली आहे, त्याने गाडीची चावी या अल्पवयीन मुलाला दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांचे नाव तानाजी शिंदे तर सर्व्हिसिंग सेंटरवरील व्यक्तीचे आकाश बोडके असे […]

bjp mla kisan kathore
महाराष्ट्र

आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा भीषण अपघात, दोघांचा दुर्दैवी मृत्यू

कल्याण : भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. या अपघातात एक तरुण आणि एक तरुणीचा मृत्यू झाला आहे. आमदार किसन कथोरे यांच्या मणक्याला दुखापत झाली आहे अशी माहिती मिळत आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या गाडीने कल्याण तालुक्यातील दहागावजवळ एका दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर असलेल्या एका तरुणाचा आणि तरुणीचा दुर्दैवी […]

mla kisan kathore car accident
महाराष्ट्र

आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी

अंबरनाथ: मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीला एका दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार दोघेही जखमी झाले असून आमदार किसन कथोरे यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे. आमदार किसन कथोरे हे टिटवाळा येथून एक कार्यक्रम आटपून बदलापूरच्या दिशेने चालले असता वाहुली गावाजवळ एका भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने आमदार किसन […]

mahabaleshwar satara accident
महाराष्ट्र

महाबळेश्वरहून निघालेल्या दांपत्याची कार दरीत कोसळून अपघात

वाई : महाबळेश्वरहून मुंबईला जात असताना पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात सकाळी पर्यटकांची कार सहाशे फूट खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात एक महिला ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. मुंब्रा येथील दांपत्य कारने (MH 02 EH 1208) मुंबईकडे जात असताना पाचगणी-वाई रस्त्यावर पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने संरक्षक कठडा तोडून गाडी ६०० […]

Ravi Shankar Prasad
देश राजकारण

केंद्रीयमंत्री रविशंकर प्रसाद थोडक्यात वाचले; त्याच्या हेलिकॉप्टरला अपघात

पाटणा : केंद्रीय विधी व न्याय खात्याचे मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हेलिकॉप्टरला अपघात झाला. ही घटना बिहारची राजधानी पाटणा येथे विमानतळावर घडली. उतरत असताना पाटणा विमानतळावर तारेच्या कुंपणाला हेलिकॉप्टरच्या पंख्याचा स्पर्श झाला. यामुळे हेलिकॉप्टरच्या पंख्याचे पाते तुटले. या अपघातातून रविशंकर प्रसाद थोडक्यात वाचले, ते सुरक्षित आहेत. हेलिकॉप्टरमध्ये बिहारचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय आणि संजय झा होते. […]