Four killed in Pune-Bangalore National Highway accident
महाराष्ट्र

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वहागांव गावच्या हद्दीत अतिशय भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की स्विफ्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. भरधाव वेगाने जाणार्‍या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे घडलेल्या या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरहून कार (क्र. एम.एच. 07 ए.बी. 5610) ही अतिशय वेगात कोल्हापूरहून पुण्याकडे जात होती. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही कार वहागांव (ता. कराड) गावच्या हद्दीत असताना चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ही कार महामार्ग ओलांडून पुण्याहून कोल्हापूरकडे जाणार्‍या लेनवर जाऊन अज्ञात वाहनावर आदळल्याने भीषण अपघात घडला. ज्यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला, अन्य एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे.

कार एवढी वेगात होती की, अपघातानंतर कारमधील पाचही जण कार मध्येच अडकून पडले होते. चुराडा झालेल्या कारमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी पोलिसांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत