Avinash Bhosale

बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कार्यालयावर ईडीकडून छापेमारी

पुणे महाराष्ट्र

पुणे : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या पुण्यातील एबीआयएल हाऊस या कार्यालयावर ईडीने छापेमारी केली आहे. फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. विदेशी चलन प्रकरणात अविनाश भोसले यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

ईडीचे अधिकारी सकाळी ८. ३० पासून अभिल कार्यालयात कागदपत्रांची तपासणी करत असल्याचं सांगण्यात येत आहे. आयबीच्या परवानगीविना विदेशी बँकेतील अकाउंटमध्ये ५०० कोटी जमा झाले, असा संशय ईडीला आहे. त्यासंबंधी ईडी अधिक तपास करत आहे. याआधीही नोव्हेंबरमध्ये अविनाश भोसले यांची ईडीने चौकशी केली होती. नोव्हेंबरमध्ये ईडीने भोसले यांना मुंबईत चौकशीसाठी बोलवून घेतलं होतं. तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यानं त्यांची तब्बल दहा तास चौकशी केली होती.

अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. ते कोट्यवधी रुपयांच्या एबीआयएल ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत