Petrol, diesel prices

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत पुन्हा वाढ, दर पोहोचले विक्रमी पातळीवर.. जाणून घ्या नवे दर

देश

नवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलचे दर आज पुन्हा विक्रमी पातळीवर पोहोचले. तेल विपणन कंपन्यांनी केलेल्या वाढीनंतर पेट्रोलच्या किंमती आज प्रतिलिटर 29 ते 30 पैसे तर डिझेलच्या किंमती 25 ते 27 पैशांनी वाढल्या आहेत.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या म्हणण्यानुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रतिलिटर. 87.60 रुपये होती तर डिझेल 77.73 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोचले आहे. दरम्यान, मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 94.12 प्रति लिटर आणि 84.33 प्रति लीटरपर्यंत वाढले आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल 88.92 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 81.31 रुपये प्रति लीटर आणि चेन्नईत पेट्रोल 89.96 रुपये आणि डिझेल 82.90 रुपये झाले.

उत्पादन शुल्क, डीलर कमिशन व इतर वस्तू जोडल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलतात. यानंतर नवीन दर लागू आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत