Housing Minister Atul Save gave encouragement to the students in the incident

गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी दिला उमदी घटनेतील विद्यार्थ्यांना धीर

महाराष्ट्र

सांगली : उमदी गावामध्ये असलेल्या समता अनुदानित आश्रमशाळेमधील विद्यार्थ्यांना काल (27 ऑगस्ट) रात्री जेवणानंतर अन्नातून विषबाधा झाल्याची लक्षणे दिसून आल्यानंतर या विद्यार्थ्यांना जत, माडग्याळ, कवठेमहांकाळ व मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल करण्यात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

याची दखल घेत गृहनिर्माण व इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज ग्रामीण रूग्णालय जत येथे भेट देवून या घटनेची सविस्तर माहिती घेतली. जत रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करून विद्यार्थी व त्यांच्या पालकांना धीर दिला. अन्नातून विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांवर आवश्यक ते योग्य उपचार करावेत, अशा सूचना सावे यांनी आरोग्य प्रशासनास दिल्या.

यावेळी प्रांताधिकारी अजयकुमार नष्टे, तहसिलदार जीवन बनसोडे, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर, वैद्यकीय अधीक्षक श्रीमती डॉ. देशमुख, गटविकास अधिकारी आप्पासो सरगर उपस्थित होते.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत