Minister Eknath Shinde
ग्लोबल देश महाराष्ट्र

भारत-युगांडातील परस्परसंबंध दृढ व्हावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भारत आणि युगांडा दरम्यान थेट हवाई संपर्कामुळे व्यवसाय, व्यापार, संस्कृती, पर्यटन, आरोग्य सेवांचा विस्तार होणार आहे. अशा पाऊलामुळेच दोन्ही देशांतील परस्पर संबंध दृढ होणार असून समृद्धी, शांतता व चांगल्या भविष्यासाठी सहकार्य मजबूत होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

युगांडा प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय दिन आणि मुंबई-एंटेबे थेट उड्डाणाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंत्री धर्मरावबाबा आत्राम, मंत्री एडवर्ड वामला, प्रा जॉयस किकाफुंडा, मधुसूदन अग्रवालजी, विनोद सरोगीजी आणि अबुल हुसेन समीर सोमय्याजी, जुही चावला, जय मेहता आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सुरुवातीला मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना युगांडा प्रजासत्ताकच्या राष्ट्रीय दिना निमित्त शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, युगांडा हा आफ्रिकेतील सर्वात सुंदर देशांपैकी एक आहे. भारत आणि युगांडाचे द्विपक्षीय संबंध अनेक दशकांपासून आहेत. 40 हजारांपेक्षा जास्त भारतीय आज युगांडात राहतात आणि ते युगांडाच्या विकासात योगदान देत आहेत. आज सुरु होणाऱ्या भारत ते युगांडा विमानसेवेमुळे दोन्ही राष्ट्रांच्या अर्थव्यवस्थेत निश्चितच भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत