Diesel tanker explosion Beed, Fire at Kolwadi Fata, Traffic jam due to tanker fire, Firefighters at Dhule-Solapur highway
बीड महाराष्ट्र

बीड : धुळे-सोलापूर महामार्गावर डिझेल टँकरचा भीषण स्फोट

बीड : बीड जिल्ह्यात शुक्रवारी भीषण अपघात घडला, जेथे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर एका डिझेल टँकरला स्फोट होऊन मोठी आग लागली. ही आग इतकी प्रचंड होती की संपूर्ण परिसर धुराने आणि ज्वाळांनी व्यापला होता. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील सीमेवर असलेल्या पाली घाटातील कोलवाडी फाट्यावर हा स्फोट झाला. टँकर उलटल्यानंतर, टँकर घसरला आणि मोठ्या प्रमाणात डिझेल रस्त्यावर […]

पुणे महाराष्ट्र

नवले ब्रिज परिसरातील अपघातातील मृतांचा आकडा वाढला, सात जणांचा मृत्यू, 15 ते 20 जण जखमी

पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले ब्रिज परिसरात गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. दोन कंटेनर आणि एका कारचा झालेला हा अपघात इतका भीषण होता की, सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाला. ब्रेक […]

Navale Bridge Pune accident — car trapped between burning containers on Pune-Bengaluru Highway
पुणे महाराष्ट्र

नवले पुल परिसरात भीषण अपघात; दोन कंटेनर आणि कार जळून खाक, 5 जणांचा मृत्यू

पुणे : पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुल परिसरात पुन्हा एकदा भीषण अपघाताने हाहाकार माजला आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास दोन कंटेनर आणि एका कारचा जबरदस्त अपघात झाला. या अपघातानंतर दोन्ही कंटेनरना अचानक आग लागली असून त्यांच्या मधोमध एक कार अडकली. या कारमधील प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातात सुमारे आठ वाहने सहभागी […]

Overturned bus in Jalgaon after falling off Amoda bridge into dry riverbed; rescue teams and locals helping injured passengers
जळगाव महाराष्ट्र

जळगावात भीषण अपघात : लक्झरी बस थेट पुलावरून नदीत कोसळली – तिघांचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी

जळगाव : इंदूरहून भुसावळकडे जाणारी खासगी लक्झरी बस रविवारी पहाटे भीषण अपघाताला सामोरी गेली. आमोदा गावाजवळ मोरनदीवरील पुलावरून बस अनियंत्रित होऊन थेट नदीपात्रात कोसळली. या दुर्घटनेत तिघांचा मृत्यू झाला असून तब्बल २५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना पहाटे साडेसहा वाजताच्या सुमारास घडली. एमपी-०९-९००९ क्रमांकाची बस पुलावरून जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बसने पुलावरील […]

Raigad Khairewadi Accident : Trailer Hits Divider and Driver Dies
महाराष्ट्र

ट्रेलर दुभाजकाला धडकून पलटला, चालकाचा केबिनमध्ये अडकून जागीच मृत्यू

रायगड : रायगड जिल्ह्यातील मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खैरेवाडी येथे ट्रेलर दुभाजकला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रेलर चालक पवन शिवाजी जाधव (वय ३३) याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताची नोंद नागोठाणे पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यात अपघातासाठी अत्यंत धोकादायक खिंड अशी ओळख असलेल्या सुकेळी खिंडीच्या उतारावरती खैरवाडी स्टॉपच्या समोर […]

Accident On Mumbai Nagpur Samruddhi Highway
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू; चार गंभीर

जालना : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने प्रथम जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढे छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले. सातही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथे आणण्यात आले आहेत. ही दुर्घटना जालन्याजवळील कडवंची गावानजीकच्या चॅनल क्रमांक ३५१ वर मध्यरात्री घडली. मृतांची […]

Five killed, four injured as car rams into truck on Mumbai-Pune Expressway
महाराष्ट्र मुंबई

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू तर चार जण जखमी

मुंबई : रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळ मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर शुक्रवारी कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. कारने ट्रकला मागून धडक दिल्याने हा अपघात झाला, या अपघातात पाच जण ठार तर चार जण जखमी झाले. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास ढेकू गावाजवळ हा अपघात झाला. सर्व मृत पुरुष असून चार जखमींपैकी एक महिला असल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून […]

Mumbai-Pune Expressway Highway Accident Truck Falls From Bridge
पुणे महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर कंटेनर पुलावरून खाली कोसळल्याने भीषण अपघात, दोन जण गंभीर जखमी

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात झाला आहे. मुंबईकडे जाणारा एक कंटेनर एक्सप्रेस वेवर नव्याने उभारण्यात येत असलेल्या पुलावरून खाली कोसळला. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. खंडाळा घाटातील खोपोली एक्झिटजवळील उतारावर आज सकाळी साडेसातच्या सुमारास हा अपघात झाला. कंटेनर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. कंटेनर पुलावरून कोसळल्यामुळे […]

A tragic accident near Sribalaji in Nagaur in Rajasthan, 12 Killed And 6 Injured
देश

जीप आणि ट्रेलरमध्ये भीषण अपघात, 12 जणांचा मृत्यू तर 6 जणांची प्रकृती गंभीर

राजस्थान : राजस्थानमधील नागौर येथे श्रीबालाजीजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मध्य प्रदेशातील 12 जणांचा मृत्यू झाला असून 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. नोखा बायपासवर जीप आणि ट्रेलर यांच्यात भीषण धडक झाली. सर्व मृत हे मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील सज्जन खेडा आणि दौलतपूर गावातील रहिवासी असल्याचे सांगितले जाते. मिळालेल्या माहितीनुसार, या 12 […]

mumbai pune expressway accident 3 passed away
पुणे महाराष्ट्र

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तीन वाहनांचा भीषण अपघात, तीन जणांचा जागीच मृत्यू

लोणावळा : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटून तीन वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. खंडाळा घाटातील खोपोली एक्झिट ते फुडमॉल दरम्यानच्या तीव्र उतारावर ही दुर्घटना घडली. या अपघातात कारमध्ये असलेल्या एकाच कुटुंबातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झाला. […]