Accident On Mumbai Nagpur Samruddhi Highway
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू; चार गंभीर

जालना : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने प्रथम जालन्याच्या जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढे छत्रपती संभाजीनगरला हलवण्यात आले. सातही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी येथे आणण्यात आले आहेत. ही दुर्घटना जालन्याजवळील कडवंची गावानजीकच्या चॅनल क्रमांक ३५१ वर मध्यरात्री घडली. मृतांची पूर्ण नावे पटवण्याचे काम सुरू आहे .

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

स्विफ्ट डिझायर कार (क्र. एमएच.१२. एमएफ. १८५६) डिझेल भरल्यानंतर निघाली होती. तर ईरटीका कार (क्र. एमएच. ४७. बीपी .५४७८) नागपूरहून मुंबईकडे निघाली होती. अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्ग पोलीस आणि तालुका जालना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या साह्याने बचाव कार्य करत दोन्ही कार समृद्धी महामार्गाच्या बाजूला घेऊन रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.

दोन्ही कारमधील १०/१२ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी ४ प्रवाशांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यातील ३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले, एकावर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेतील मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय डॉ. उमेश जाधव यांनी दिली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत