Wrestler Suraj Nikam Suicide In Sangli At His Home
क्राईम महाराष्ट्र

कुमार महाराष्ट्र केसरी’ सूरज निकमने गळफास घेत आयुष्य संपवलं

सांगली : सांगलीतला तरुण पैलवान सूरज निकमने त्याच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. सूरज निकम हा कुमार महाराष्ट्र केसरी पैलवान होता. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस याबाबत तपास करत आहेत. कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करुन आस्मान दाखवणाऱ्या सूरजने अशा पद्धतीने आयुष्याचा शेवट केल्याने हळहळ व्यक्त होते आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

सूरज निकमचा दीड महिन्यापूर्वीच विवाह झाला होता. त्याच्या पश्चात त्याची आई, पत्नी आणि भाऊ असा परिवार आहे. शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सूरजने गळफास घेतल्याचं त्याच्या नातेवाईकांना समजलं. त्याचे मामा भास्कर जोतीराम जाधव यांनी सूरजला रुग्णालयात आणलं होतं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कुस्ती क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारा हा मल्ल काळाच्या पडद्याआड गेला आहे. गेल्या वर्षी झालेल्या कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत त्याने कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धा जिंकत मानाची गदा पटकवली होती.

सूरज त्याच्या वडिलांचं निधन झाल्याने तो व्यथित झाला होता. शुक्रवारी म्हणजेच आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास त्याने राहत्या घरात गळफास लावून घेतला आणि आयुष्य संपवलं. सूरजच्या निधनाचं वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सूरजच्या निधनानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. शनिवारी दुपारी त्याचे बंधू आल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत अशी माहिती आहे. पैलवान सूरजच्या आत्महत्येचं कारण काय? ते समजू शकलेलं नाही. पोलीस त्या अनुषंगाने तपास करत आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत