one died, five injured in a fire that broke out due to an explosion at Jakharia Fabric Ltd in Boisar
महाराष्ट्र

पालघरमधील बोईसरयेथील जखारिया फॅब्रिक लिमिटेड कंपनीत भीषण स्फोट

पालघर : बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्रातील जखारिया फॅब्रिक लिमिटेड या कंपनीत शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास भीषण स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जण जखमी झाले आहेत. एक कामगार बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

कारखान्यातील बॉयलरचा भीषण स्फोट झाल्यामुळे कापड निर्मिती करणाऱ्या या कारखान्यात भीषण आग लागली. या स्फोटाचा आवाज तीन ते चार किलोमीटरच्या परिसरापर्यंत ऐकू आला. स्फोटात एक कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर एक कामगार बेपत्ता आहे. पाच कामगार जखमी झाले असून त्यांच्यावर बोईसरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

या आगीत मिथिलेश राजवंशी नावाच्या कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर, छोटे लाल सरोज हा कामगार बेपत्ता आहे. जखमींमध्ये अरविंद यादव, अमित यादव, मुकेश यादव, मुरली गौतम आणि उमेश राजवंशी यांचा समावेश आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत