fire
महाराष्ट्र

तळोजा औद्योगिक वसाहतीत कारखान्याला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या जवानाचा मृत्यू

पनवेल : तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखान्याला लागलेल्या आगीत अग्निशमन दलाच्या एका जवानाचा गुदमरुन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाळू देशमुख असं मृत जवानाचे नाव आहे. औद्योगिक क्षेत्रात भूखंड क्रमांक जे-39 वर असलेल्या मोदी केमिकल या रसायनांवर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्याला काल (5 डिसेंबर) रात्री 12 च्या सुमारास आग लागली.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांना पहाटे 5 वाजताच्या सुमारास या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं. मात्र आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात अग्निशमन दलाचे जवान बाळू देशमुख यांचा मृत्यू झाला. ते अंबरनाथ अग्निशमन दलाच्या पथकात कार्यरत असल्याची माहिती आहे. जखमी जवानांना जवळच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने इतर जवानांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तळोजा औद्योगिक क्षेत्रातील अग्निशमन दलाचे प्रमुख दीपक दोरुगडे यांचा देखील समावेश आहे.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत