girl flushed newborn in toilet
देश

बलात्कार पीडितेने नवजात भ्रुणाला टॉयलेटच्या कमोडमध्ये फ्लश केले…

कोचीन : केरळच्या कोचीन जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या एका अल्पवयीन मुलीने वेळेआधीच जन्माला आलेल्या आपल्या नवजात भ्रुणाला टॉयलेटच्या कमोडमध्ये फ्लश केले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

एका २० वर्षांच्या तरुणाने या अल्पवयीन पीडितेवर कथितरित्या बलात्कार केल्यानंतर ती गर्भवती राहिली होती. वायनाड जिल्ह्यातून पोलिसांनी आरोपीला गेल्या गुरुवारी अटक केली. वायनाडहून पोलिसांनी आरोपीला कोचीनला आणलं असून त्याला लवकरच दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाईल.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलीने गर्भवती असल्याचं कुणालाही सांगितलेलं नव्हतं. ती ६ महिन्यांची गर्भवती होती. गेल्या बुधवारी संपूर्ण प्रकरण उघडकीस आले, जेव्हा अल्पवयीन बलात्कार पीडित मुलगी पोटात दुखू लागल्यामुळे आपल्या आईसोबत तपासणीसाठी एका खासगी रुग्णालयात गेली होती. इथेच रुग्णालयाच्या टॉयलेटमध्ये तिने बाळाला जन्म दिला. मात्र, ही गोष्ट डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सांगण्याऐवजी तिने भ्रुणाला कमोडमध्ये फ्लश केले. मात्र, तरुणी बाहेर आल्यानंतर टॉयलेट वापरण्यासाठी गेलेल्या अन्य एका व्यक्तीला कमोडमध्ये भ्रुणाचे अवशेष दिसले. त्यानंतर त्याने तात्काळ रुग्णालयाला आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. इथे पोलिसांना संबंधीत मुलीने हे कृत्य केल्याचं समजलं, त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याने तिची चौकशी केली. या मुलीने चौकशी दरम्यान कबूल केले की तिचे आरोपीशी अफेअर होते, तसेच या मुलीने आपले कृत्य स्वीकार केले. आरोपी तरुणासोबत शारीरिक संबंधांनंतर अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. नंतर पीडितेच्या आईच्या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी २० वर्षीय आरोपीविरुद्ध ‘पॉक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत